मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली आहे. 153 अ आ कलमाखाली राणा दाम्पत्याला अटक  करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात मुंबईतल्या खार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर आज दुपारी खार पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी दाखल झाले. यावेळी राणा दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घातली. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेलं. राणा दाम्पत्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.


नवनीत राणा यांचं आवाहन
पोलिसांनी कारवाई केल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. आज ज्या पद्धतीने पोलीस आमच्या घरात जबरदस्तीने घुसले आहेत, एक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी दिलेल्या नोटीशीमुळे आम्ही घराबाहेर पाऊल ठेवलं नाही. पण आज पोलीस घरात घुसले, आणि जबरदस्तीने पोलीस स्टेशनला नेलं आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक  प्रश्न विचारायचा आहे, ज्या पद्धतीने संविधान, नियम कायदयाचं पालन केलं, नोटीशीनंतर घराबाहेरही आम्ही पाऊल ठेवलं नाही. तरीही आमच्यावर गुन्हा दाखल होतो, कोणता नियम, संविधान महाराष्ट्रात पाळला जात आहे. 


मी पंचवीस लाख लोकांचं नेतृत्व करते, पण या पद्धतीची गुंडशाही याआधी आम्ही कधीही महाराष्ट्रात पाहिला नाही. खासदार, आमदारांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पोलीस स्टेशनपर्यंत नेलं जात आहे. 


मी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना विनंती करते, तुमच्या सारखे नेते असतानाही महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीबरोबर असा व्यवहार होत आहे, आमच्या सारख्या लोकांना न्याय मिळू शकत नाही महाराष्ट्रात तर भविष्यात कोणीही न्यायासाठी लढणार नाही असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं.