मुंबई पोलिसांची किर्ती सातासमुद्रापार
मुंबई पोलिसांची कामगिरी
मुंबई : मुंबई पोलिसांची कामगिरी सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या एडम जॅक्शनचं हरवलेलं 10 लाखाचं सामान मुंबई पोलिसांनी त्याच्याकडे सुपूर्त केलं आहे. यामुळे मुंबई पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ऑस्ट्रेलियन नागरिक असलेला एडम जॅक्शन अबू धाबीमध्ये राहतो. काही कामानिमित्त शुक्रवारी मुंबईत आला. रात्री 10 वाजता गोरेगाव येथील हॉटेल फर्नमध्ये जाण्याकरता टॅक्सी पकडली. यावेळी एडम टॅक्सीतच आपलं 10 लाखाहून अधिक रकमेचं सामान विसारला. या सामानात लॅपटॉप, कॅमेरा, लेन्स आणि घड्याळ होतं.
हॉटेलमध्ये पोहोचल्यावर एडम याला आपण सामान टॅक्सीतच विसरल्याचं लक्षात आहे. सुरूवातीला त्याने हा प्रकार कुणालाच न सांगता सामानाची आशा सोडून दिली. मात्र नंतर घडलेला सगळा प्रकार हॉटेलच्या मॅनेजरला सांगितला. त्याने याबाबत कायेदशीर तक्रार करण्याचा सल्ला एडमला दिला.
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी एडमने वनराई पोलीस ठाण्यात याबाबत कायदेशीर तक्रार केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एपीआय भरत घोणे करत असून त्यांना टॅक्सी चालकाचं सीसीटीव्ही फुटेजवरून टॅक्सीचा नंबर. त्यानंतर टॅक्सी चालकाचं नाव आणि पत्ता शोधून काढला. वडाळाचं घर टॅक्सी चालकाने घर बदल्याचे समजले. त्यानंतर कुलाबा पोलिसांच्या मदतीने त्यांनी टॅक्सी चालकाला शोधले आणि संपूर्ण सामान एडम यांच्या हवाली केले.
या संपूर्ण प्रकाराने एडम अत्यंत खूप झाला. ज्या सामानाची अपेक्षाच आपण सोडली होती ते सामान सापडल्यामुळे एडमला प्रचंड आनंद झाला. मुंबई पोलिसांचं कौतुक पुन्हा एकदा सातासमुद्रापार गेलं आहे.