मनसुख हिरेन हत्याप्रकरणी आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला अटक
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील निरिक्षक सुनील माने याला NIAने अटक केली आहे.
मुंबई : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील निरिक्षक सुनील माने याला NIAने अटक केली आहे.
काही आठवड्यांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर लगेलच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे गुढ वाढले. मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी सचिन वाझेला NIAने याप्रकरणी अटक केली.
याप्रकरणी तपासात सचिन वाझेला मदत करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही प्रकरणांचा तपास NIAकरीत आहे. आता NIA ने पोलीस निरिक्षक सुनील मानेला अटक केली. आहे.