Disha Salian Case: सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांची 12 जुलै रोजी पोलिसांना चौकशी करायची आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याने नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे. दिशा सालियनच्या मृत्यूमागे मोठे लोक, नेते आणि मंत्री असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. दिशा सालियन हत्या करण्यात आल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला होता. राणे यांनी केलेल्या दाव्यासाठी त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत याची चौकशी आता पोलिस करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दिशा सालियनने 8 जून 2020 रोजी तिच्या अपार्टमेंटच्या 14व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर लगेचच सुशांतचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. CBIच्या माहितीनुसार दिशाने 8 जून रोजी रात्री तिच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये तिने भरपूर मद्यपान केले होते. 


नोटीसमध्ये नेमकं काय? 


दिशा सालियन प्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे यांना नोटीस पाठवली असून त्यांना उद्या, 12 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. दिशा सालियन यांची हत्या झाल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. त्याच्या दाव्याबाबत पोलीस त्याची उद्या चौकशी करतील आणि त्याच्याकडे हत्येचे काय पुरावे आहेत ते विचारतील.



दिशाचा व्हिडीओ व्हायरल 


दिशा सालियनच्या मृत्यूपूर्वी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. हा व्हिडीओ तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये रोहन राय आणि मित्रांसोबत पार्टी करताना दिसत होती. व्हिडीओमध्ये दिशाच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे टेंशन दिसत नव्हते. दिशाच्या कुटुंबियांनी या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी याला आत्महत्येचे प्रकरण ठरवून ही केस बंद केली.