मुंबई : मुंबईतल्या वडाळा परिसरात एक थरार नाट्य घडलं. कर्तव्यावर असलेल्या मुंबई पोलिसाने जीवाची बाजी लावत एका मुलीचे जीव वाचवल्याची घटना घडली आहे. तरुणीला जीवघेण्या हल्ल्यापासून वाचवताना पोलीस गंभीर जखमी झाला. पण तो मागे हटला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
वडाळा इथल्या बरकती अली नाका इथे राहणारी तरुणी कामावर जाण्यासाठी निघाली. त्याचवेळी अनिल बाबर नावाचा तरुण हातात चाकू घेऊन तिच्यावर हल्ल्या करण्यासाठी धावला. तिथे तैनात असणाऱ्या अंमदार मयुर पाटील यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी त्यांनी तात्काळ घाव घेत आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. 


आरोपीने मयुर पाटील यांच्यावरही चाकूने हल्ला केला. यात मयुर पाटील जखमी झाले. इतर पोलिसांनी अनिल पकडून त्या मुलीला आणि मयुर पाटीलला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. 


मुलीच्या आई-वडिलांनी लग्नाला नकार दिल्याने अनिल बाबर संतापला होता. यावरुन अनिल बाबरचा त्या मुलीशी वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात अनिल बाबरने त्या मुलीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वडाळा पोलिसांनी दिली.