मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. तसेच मुंबईतही धोका वाढला आहे. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) कोरोनाशी (Coronavirus) लढण्यासाठी आता नवे सुरक्षा कवच मिळणार आहे. पोलिसांसाठी संपूर्ण चेहरा कव्हर होईल, असे पर्सनल प्रोटेक्शन कीटचे वाटप होणार आहे. या अभियानाची सुरुवात गृहमंत्री अनिल देशमुख (AnilDeshmukh) यांनी केली. मुंबईत आज पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या हस्ते या पर्सनल प्रोटेक्शन कीटचे वाटप करण्यात आले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन काळात राज्यातील पोलीस उत्तम कार्य करीत असून कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केले.
 
दरम्यान, पुण्याच्या लॅबमध्ये  कोरोना प्रतिबंधक कीट तयार करण्यात आले आहे. या किटचा वापर पोलीस, सफाई कर्मचारी तसेच आरोग्य क्षेत्रातील लोकांना होणार आहे. लवकरच हे किट जास्तीत जास्त कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.



तर दुसरीकडे राज्यात कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. राज्यात आज कोरोना बाधित ४७ नवीन  रुग्णांची नोंद झाली.यातील रुग्ण मुंबई २८, ठाणे परिसर १५, अमरावती १, पिंपरी चिंचवड १, पुणे २ असा रुग्णांचा समावेश आहे.यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५३७ झाली आहे.यातील आतापर्यंत ५० सदस्य बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.