मुंबई : Mumbai Police prohibits : आताची मोठी बातमी. 31 डिसेंबर आणि नव वर्षाचे स्वागत करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. (New Year Celebration Party rules) मुंबईत आता समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी 5 नंतर फिरणाऱ्यास बंदी घालण्यात आली आहे. (Mumbai Police prohibits citizens from visiting beaches open grounds sea faces public places from 5 PM to next day 5 AM )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर संध्याकाळी फिरण्याचा बेत करत असाल तर तो रद्द करा आणि घरीच 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करा. कारण संध्याकाळी 5 नंतर घराबाहेर पडता येणार नाही. मुंबई पोलिसांनी नागरिकांना संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत समुद्रकिनारे, मोकळी मैदाने, समुद्राचे दर्शनी भाग, विहार, उद्याने, उद्याने किंवा तत्सम सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. हा आदेश 15 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.



 सध्या कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचा (omicron) धोका वाढला आहे. त्यामुळे काही निर्बंध असताना लोक अजूनही कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी केली आहे. उद्यापासून मुंबईत नवी नियमावली लागू होणार आहे.