मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे कारभाराचे वाभाडे काढण्यात आघाडीवर असणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर जुना व्हीडिओ शेअर केल्याचे उघड झाले आहे. सोमय्या यांनी मुंबई पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याचा व्हीडिओ शेअर केला होता. या महिलेला कोरोनामुळ श्वास घेण्यात अडचण येत होती. तरीही तिला बराच काळ रुग्णवाहिकेसाठी तिष्ठत उभे राहावे लागले, असे सोमय्यांनी म्हटले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ


मात्र, मुंबई पोलिसांनी यावर तात्काळ खुलासा करत सोमय्या यांचा हा दावा फेटाळून लावला. मुंबई पोलिसांनी ट्विट करून म्हटले की, हा व्हीडिओ आत्ताचा नसून १६ तारखेचा आहे. तसेच या महिला पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झालेला नाही. आता ती पूर्णपणे तंदरुस्त आहे. कृपया नागरिकांनी खात्री न करता व्हीडिओ शेअर करु नयेत, असे मुंबई पोलिसांनी सोमय्यांना रिप्लाय देताना म्हटले. विशेष म्हणजे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनाही मुंबई पोलिसांचा हा रिप्लाय आवडला. आदित्य यांनी मुंबई पोलिसांचे हे ट्विट लाईक केले. तर मुंबई पोलिसांच्या खुलाशानंतर सोमय्या यांनी संबंधित व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हटवला आहे. 



महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे ३०४१ नवे रुग्ण आढळून आले. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. राज्याने पहिल्यांदाच एका दिवसांत 3 हजार रुग्ण वाढीचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईत रविवारी 1725 कोरोना रुग्ण वाढले होते. त्यामुळे एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 30, 542 इतका झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 988 जण कोरोनामुळे दगावले आहेत.देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 50 हजार 231वर गेली आहे. राज्यात सध्या 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.