अरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

राज्यात आज पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

Updated: May 24, 2020, 08:14 PM IST
अरे देवा... राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ title=
संग्रहित फोटो

मुंबई : देशासह महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. राज्यात आज पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्याने पहिल्यांदाच एका दिवसांत 3 हजार रुग्ण वाढीचा टप्पा ओलांडला आहे. एका दिवसांत तब्बल 3041 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसांत राज्यात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 50 हजार 231वर गेली आहे. राज्यात सध्या 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

राज्यात आज एका दिवसांत 1196 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 14 हजार 600 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

कोविड-19मुळे राज्यात आतापर्यंत 1635 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज एका दिवसांत 1725 कोरोना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजार 542वर पोहचला आहे. मुंबईत आतापर्यंत 988 जण कोरोनामुळे दगावले आहेत. 

लॉकडाऊन उठवण्याबाबत मुख्यमंत्र्यांची एक अट

 

धारावीत आज 27 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत एकूण कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या 1541वर गेली आहे. आतापर्यंत धारावीत कोरोनामुळे 60 हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. दादरमध्ये 9 रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 219 झाली आहे. तर माहिममध्ये 11 नवे रुग्ण वाढले असून आतापर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 317 इतका झाला आहे. 

लॉकडाऊननंतर खासगी कारच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता