मुंबई : पोलिसांच्या पगारावर चोराने डल्ला मारल्याचा पुढे आलाय. हा डल्ला ऑनलाइन मारण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांना पगार झाल्याचे मॅसेज आला आणि त्याचवेळी दोन तासांत मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. त्यावेळी पगाराची चोरी झाल्याची घटना पुढे आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या सायबर चोरीबाबत तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील काही पोलिसांच्या पगारावर ऑनलाइन डल्ला मारल्याचे सांगण्यात येत आहे. यायबर गुन्ह्यांत दिवसागणिक वाढ होत आहे. आता तर याचा फटका काही पोलिसांनी बसल्याचे यावरुन स्पष्ट झालेय.


मुंबई पोलिसांची सॅलरी अकाऊंट ज्या बँकेत आहेत. त्या बॅंकेत पगार झाल्याचा मेसेज पोलिसांच्या मोबाईलवर आला.  ३१ ऑक्टोबरला पोलिसांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आणि अवघ्या दोन तासांतच पैसे काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यामुळे अनेक पोलिसांनी या मेसेजचा धक्का बसला. माटुंगा, कफ परेड तसेच दादर पोलीस ठाण्यातील अनेक पोलिसांच्या खात्यामधून पैसे गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी यासंदर्भात लेखी तक्रार त्या त्या पोलीस ठाण्यात केल्याचे सांगितले जात आहे.


ज्या बॅंकेत पोलिसांचा पगार होतो, त्या बॅंकेची हॅक झालेली खाती हीदेखील दादर शाखेतील असून काहींनी याबाबत बँक मॅनेजरकडे तक्रार केली आहे. याबाबत आणखीही तक्रारी येण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही ऑनलाइन चोरी उत्तर प्रदेशातील नोएडा, गाझियाबादमधून झाल्याचे बोलले जात आहे.


 पोलिसांचे बॅंक खाते हॅक करुन त्यातील सुमारे २० ते २५ हजारांपर्यंत पैसे काढले गेल्याचे सांगितले जात आहे.