मुंबई : मुंबईत मराठा मोर्चाच्या यशस्वी आयोजनात मुंबई पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची ठरलीय. लाखांचा हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत जबाबदारीनं आपल्या कर्तव्याचं पालन केलं. मुंबईच्या एंट्री पॉईंटपासून जिजामाता उद्यान, जेजे उड्डाण पुल ते आझाद मैदान या मार्गात वाहतूक पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे. जे. उड्डाणपुलावर रुग्णवाहिकांसाठी खास ग्रीन चॅनल तयार करण्यात आला होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी उत्तम नियोजन केलं. 


मुंबई महापालिका प्रशासनानंही त्याला चांगली साथ दिली. पिण्याच्या पाण्यापासून मोबाईल टॉयलेटपर्यंत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. रेल्वे प्रशासनानं जादा रेल्वे गाड्या सोडून मुंबईकर आणि मोर्चेक-यांच्या सुखरूप प्रवासाची सोय केली. या नियोजनाबद्दल झी मीडियाकडून तमाम सरकारी यंत्रणांना खास सलाम.