INS Vikrant | किरीट सोमय्या यांना पोलिसांची नोटीस
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kiri Somaiya) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सोमय्या यांना समन्स बजावला आहे. ''आयएनएस विक्रांत' (INS Vikrant) प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी सोमय्या यांना हा समन्स बजावला आहे. समन्सनुसार, सोमय्या यांना उद्या (9 एप्रिल) ट्रॉम्बे पोलीस स्थानकात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोमय्या यांची 'आयएएनस विक्रांत' प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. (mumbai police summons bjp kirit somaiya ins vikrant from scrapping)
नक्की प्रकरण काय?
आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला होता. सोमय्या यांनी जवळपास 50 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा केली.
किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या या दोघांनी आयएनएस विक्रांतमध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला "मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. यात कोणताही घोटाळा नाही. मी चौकशीसाठी तयार आहे", अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या चौकशीतून नक्की काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.