मुंबई : एखाद्या फायनान्स कंपनीत पैसे गुंतवले आणि त्यात काही गडबड झाल्यास घोटाळा झाल्यास पैसे परत मिळतील का? पोलीस तपास करतील का? पोलीस फ्रॉड कंपन्यांना शामिल आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न गुंतवणूक दारांना पडतात. पण मुंबई पोलिसांनी अशी कामगिरी करुन दाखवलीये ज्यामुळे पोलीसांवरील लोकांचा विश्वास वाढलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल ३५ हजार गुंतवणुकदारांना ४५० कोटी रुपये मुंबई पोलीस परत करणार आहे. झी चोवीस तासला मिळालेल्या एक्सक्लुसिव्ह माहिती नुसार या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा.


या एकूण ९ कंपन्या आहेत ज्यात ३५ हजार गुंतवणुकदार होते. गुंतवणुकदारांनी केलेल्या तक्रारीवर तपास करुन या ९ कंपन्यांचे अकाऊंट गोठवून त्यातून रोख ४० कोटी रुपये गुंतवणुक दारांना वाटले जाणार असून उर्वरीत ४१० कोटी रुपये हे त्या ९ कंपन्यांची संपत्ती विकून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दिले जाणार आहेत.


या आहेत त्या कंपन्या


- मेडीकेअर


- कॉसमॉस पब्लीसिटी


- कोकण पार्क


- सीयू मार्केटींग


- सिमॅटीक फायनान्स


- एडवेंचर ग्रुप


- वी जे एस ग्रुप


- पार्ले फायनान्स


- शिवानंद फायनान्स