मुंबई : लोकांना आजकाल कोणी ही सल्ले दिलेले आवडत नाही. त्यामुळे आता लोकांनी मीमस शेअर करुन आपल्या भावना किंवा मत दुसऱ्यांपर्यंतर पोहचवण्याचा मार्ग शोधला आहे. मीमस मध्ये लोक अत्यंत मोजक्या शब्दात आणि मजेदार पद्धतीने खूप काही बोलतात आणि ते खरचं अत्यंत इफेक्टीव्ह सुद्धा आहे. लोकांना ते लवकर समजतात. यामाध्यमातून लोकं अत्यंत महत्वाच्या गोष्टींवरही प्रकाश पाडतात, ज्यामुळे लोकांना गोष्टी समजायला सोपे जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक प्रयोग मीमसच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबईचे पोलिस बर्‍याचदा आपल्या मजेदार पोस्टसाठी चर्चेत आले आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावरील पोस्ट खूप मजेदार आणि मनोरंजक असतात. या मनोरंजक पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिस लोकांना महत्त्वाचा संदेशही देतात.


मुंबई पोलिसांनी नुकतीच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी मनीषा कोइरालाच्या ‘खामोशी’ या चित्रपटाचे प्रसिद्ध गाणं ‘आज में उपर, आसमान निचे’ या गाण्याला अशा  पद्धतीने वापरली आहे की, तुम्हाला हसू आवरणार नाही.


या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी लिहिले की, 'आज मैं ऊपर क्योंकि मास्क है नीचे.' या पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी मास्क घाला आणि तो ही व्यवस्थीत रित्या घाला, नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून लोकं ते ऎकतील आणि कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला कमी करण्यास मदत मिळेल.



काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील एक सीन शेअर केला होता. त्यात या महामारीत  हात धुण्याचे महत्त्व सांगितले आहे. या सीनमध्ये अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि नीलम कोठारीही अमिताभ बच्चनसोबत दिसले आहेत. क्रिऍटिव्ह पद्धनीने जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिस जे काम करत आहेत, त्यामुळे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.