मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नागरिकांना घरीच राहण्याच आवाहन केलं आहे. अशा परिस्थितीत फक्त अत्यावश्यक सेवा कार्यरत आहे. घरात राहण्याच आवाहन केलं जात असताना नागरिक संचारबंदीचे तीन तेरा वाजवत आहेत. यामुळे पोलिसांवर ताण पडत आहे. अशात पोलिसांच्या पत्नीने सरकारला पत्र मेलद्वारे पाठवलं असून आपल्या नवऱ्यांच्या सुरक्षिततेची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पोलीस पत्नीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र, मेल द्वारे पाठवले आहे. संचार बंदीच्या काळात पोलिसांवर होणारे हल्ले,हुज्जत या बद्दल काळजी व्यक्त करणारे पत्र सरकारला पाठवलं आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना धाक बसेल अशी कारवाई व्हावी अशी केली मागणी पोलिसांच्या पत्नीने केली आह. कोरोना महामारीच्या साथीत आपल्या कुटुंबापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे हल्ले थांबावे, हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी माहणी या पत्रातून केलं आहे. 



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा कार्यरत आहे. यासाठी महाराष्ट्र पोलीस रस्त्यावर उतरून लोकांच रक्षण करत आहेत. मात्र जनता पोलीस ही माणूस आहे ही गोष्ट विसरत चालले आहेत. त्यांच्या घरी देखील कुटूंब आहे. नागरिकांना घरी राहण्याच आवाहन करत ते स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. मात्र नागरिक पोलिसांवरच हल्ले करून त्यांना त्रास देत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पत्नीने त्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.