मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने प्रवास करणाऱ्यांसाठी आज महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करत असाल तर तुम्हाला आज वेळेचे नियोजन करुन घरातून बाहेर पडावे लागेल. अनथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. दिशादर्शक फलकाचे काम करण्यासाठी इथली वाहतूक दोन तास थांबवण्यात येईल. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जुन्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक आज दुपारी १२ ते २ या काळात जुन्या मुंबई पुणे मार्गावर वळवण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील लोणावळा आणि सोमटणे या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवण्याचे काम आज होणार आहे.. राज्य रस्ते महामंडळामार्फत यासंदर्भातील माहिती देण्यात आली. दिशादर्शक फलक बसवण्याच्या काळात मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.