मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेमध्ये होणार हा बदल
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते, सुमारे ८ किलोमीटरच हा बोगदा राहणार आहे.
मुंबई : मुंबई - पुणे एक्प्रेस वे वर वाहतुकीसाठी नवीन बोगदा बांधण्यात येणार आहे. यामुळे मुंबई - पुणे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळात अजून २५ ते ३० मिनिटचा कमी वेळ लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते, सुमारे ८ किलोमीटरच हा बोगदा राहणार आहे.
या बोगद्यातून हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. या बांधकामाची टेंडर प्रक्रिया सुरु असून लवकरच कमाल सुरवात करण्यात येणार असल्यची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई - पुणे एक्प्रेस वे वरील टोल बंद करणे सध्या तरी शक्य नसल्याचे देखील शिंदे यांनी यावेळी सांगितले.