Mumbai Pune expressway : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर दर दिवशी असंख्य वाहनांची ये-जा सुरु असते. वीकेंडला हा आकडा दुपटीनं वाढतो. याच मार्गावरील वाहतूक मंगळवारी (आज/ 28 नोव्हेंबर 2023) बंद राहणार आहे. ज्यामुळं या मार्गानं प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागणार आहे. अधिकृत माहितीनुसार मंगळवारी ही वाहतूक साधारण तीन तासांसाठी बंद असेल. पुण्याच्या दिशेनं जाणारी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. 


का बंद असेल वाहतूक? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खोपोली ते पाली फाटा या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून 50 टन वजनाचे पुलाचे गर्डर या तीन तासांच्या कालावधीत बसवण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. ज्या कारणास्तव ही वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी परवानगी दिली आहे. 


हेसुद्धा वाचा : Weather Update : पाऊस पाठ सोडेना! राज्यातील 'या' भागांना यलो अलर्ट


वरील तरतुदींनंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक मंगळवारी  (8 नोव्हेंबर 2023) दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद ठेवली जाईल. यादरम्यान, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक, काही अंशी धीम्या हतीनं मुंबईकडील मार्गिकेवर वळविण्यात येणार आहे. तर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहील. निर्धारित वेळेमध्ये गर्डरचं काम पूर्ण झाल्यावर पुण्याकडील वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती यंत्रणांकडून देण्यात आली आहे. त्यामुळं सध्या करण्यात आलेली व्यवस्था पाहा वाहन चालकांना वेगळ्या वाटांवरून जाण्याऐवजी त्याच रस्त्यावरून काहीशा विलंबानं प्रवास करता येईल हे स्पष्ट होत आहे. 


एक्स्प्रेस वे बंद असण्याच्या कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक 9822498224 ; महामार्ग पोलीस विभाग 9833498334.