मुंबई : शहरासह आसपासच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारली होती. मात्र पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पाऊस गेल्या काही दिवसांपासून जोरदार बरसतोय. मुंबईलाही (Mumbai Rain Update) हवामान खात्याने (Imd) इशारा दिला आहे. पावसाच्या गैरहजेरीमुळे मुंबईकरांना उष्णतेचा मारा सहन करावा लागला. मात्र आता पावसाने पुन्हा  एन्ट्री  घेतलीय. तसेच मुंबईकरांना ढगाळ वातावरण आणि सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे. (mumbai rain buildings are surrounded by clouds see clasic video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबापुरीत अनेक ठिकाणी धुकंही दिसून आलं. जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धुकं बरेच खाली आल्याचे पाहायला मिळत आहे.तर आकाशाशी स्पर्धा करणाऱ्याया टोलेजंग इमारती ढगांमध्ये हरवून गेल्याच्या पाहायला मिळाल्या. गगनचुंबी इमारतींचे वरचे मजले ढगांनी वेढले गेले. ही विहंगम दृश्यं भूरळ पाडणारी अशीच आहेत. झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी त्याची ही खास भेट. 



राज्यभरातही पावसाचा जोर कायम


दरम्यान, राज्यभरातही पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवस राज्यात असाच पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र घाट, मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.