Mumbai Rains Today : उन्हामुळे अंगाची लाहीलाही होणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. शनिवारपासून मुंबईतील हवामान गार झालं आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये रात्रीपासून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडतो. रविवार कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना अचानक आलेल्या पावसामुळे नाहक त्रास झाला. परळ, दादर, कुर्ला, सायन, चेंबूर परिसरात पाऊस पडलाय. त्यामुळे आज घराबाहेर पडताना छत्री सोबत घ्यायला विसरु नका. (#MumbaiRains



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी मुंबईत कमाल आणि किमान तापमान 32 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस होतं. रविवारी सकाळी मुंबईच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शहरातील उष्ण आणि दमट वातावरणातून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आणि त्यांचा विकेंड मस्त झाला. 



 मुंबई, ठाण्यासह नाशिकजवळील अनेक भागात विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि नाशिकला यलो अर्लट जारी करण्यात आला. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून थोडासा दिसाला मिळाला आहे. मुंबईत 4 मेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. मात्र पावसाची शक्यता कमी आहे. 


आज मुंबईकरांची सकाळ अवकाळी पाऊस आणि इंद्रधनुष्याच्या स्वागताने झाली. आज रविवार असल्याने अनेक ऑफिसला सुट्टी असल्याने मुंबईकरांनी घरात राहून पावसाचा मस्त गरमा गरम चहा सोबत आनंद लुटला.



अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांना घरात छत्री आणि पावसाळी शूटची शोधा शोध करावी लागली. राज्यात अख्खा महिनाभर अवकाळी पाऊस आणि गारपिटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. पिकांसह लोकांचे घरं आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


ठाण्यात शनिवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा पडला. 


भारतातील इतर राज्यांबद्दल बोलायचं झालं तर केरळ, तामिळनाडू, कोस्टल एपी, ओडिशा, GWB, पूर्व राजस्थान, मध्यप्रदेश, कच्छ, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, मेघालय लगतच्या पूर्व आसामच्या काही भागांमध्ये मध्यम ते तीव्र वादळासह हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.