मुंबई : काल अतिवृष्टीमुळे ठप्प झालेले मुंबई आज पूर्वपदावर येताना दिसत आहेत. सखल भागात साचलेले पाणी ओसर आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरु झालेय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन रेल्वे कल्याणकडे रवाना होत आहेत. लोकल सेवा धिम्यागतीने सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रे - वरळी सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.सकाळी ६ वाजल्यापासून गाड्यांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आलेय. काल दुपारनंतर  अतिवृष्टीमुळे सागरीसेतू वाहतुकीसाठी बंद केला होता. पुन्हा अतिवृष्टी इशारा असल्याने तशी परिस्थिती झाल्यास पुन्हा बंद करण्यात येईल, अशी माहिती MSRDC आणि मुंबई  पोलिसांनी दिलेय.


सायनमध्ये पाणी ओसरले आहे. वाहतूक सुरळीत झालेय.बस,टॅक्सी सुरु, मुंबई पूर्वपदावर येतानाचे चित्र दिसत आहे. तर दादर पूर्व रेल्वे स्थानकावर घरी जाण्याकरिता प्रवाशांची गर्दी झालीय.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन रेल्वे कल्याणकडे रवाना होत असल्याने अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय.  


तसेच पश्चिम रेल्वे पूर्ववत आहे. मात्र, हार्बरची सेवा आज सकाळी ८ वाजेपर्यंत ठप्पच होती. ८.३० वाजता पनवेलकडून मुंबईच्या दिशेने पहिली गाडी रवाना झालेय. हार्बर लोकल सुरु झाल्याने मोठा दिलासा मिळालाय.