मुंबई पावसाचा जोर वाढला, सखल भागात साचलं पाणी
मुंबईत पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या अर्ध्या ते पाऊण तासात पावसाच जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
मुंबई : मुंबईत पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या अर्ध्या ते पाऊण तासात पावसाच जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
हिंद माता परिसरात रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूकीचे तीन तेरा वाजले आहेत. गेली तीन दिवस मुंबईत पाऊस सरू आहे. तर वसई विरारमध्येही रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळी नालासोपारा पूर्व स्टेशन भाग, सेंट्रल पार्क, विजय नगर इथे सखल भाग असल्याने पावसाच पाणी साचलं आहे. सर्वदूर पाऊस कोसळत असल्यानं थोड्याफार प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
कुलाबा वेधशाळेने येत्या ३६ तासात मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.