Mumbai Rain: जून महिन्याचा पहिला आठवडा गेला तरी पाऊस पडेना म्हणून नागरिक चिंतेत होते. प्रचंड उकाड्याने मुंबईकरांची दैना उडाली होती. पाऊस कधी पडणार? याची सर्वजण वाट पाहत होते. अखेर मुंबईकरांच्या रविवारची पहाट रिमझिम सरींनी झाली आहे. ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई, डोंबिवली परिसरात पहाटे पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. जून महिन्याच्या 9, 10 तारखेला शहरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान पहिल्याच दिवशी पाऊस मोठी बॅटींग करायच्या तयारीत आहे. कारण मुंबई, ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने मुंबईकरांनी शक्य असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 



आज दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान विभागाने दिलाय. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहणार आहे. तर संध्याकाळ / रात्री हलका ते मध्यम  पाऊस असेल. किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सियस आणि  28 अंश सेल्सियसच्या आसपास असेल.



उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



कोंकण आणि मध्य महाराष्ट्रतील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.