मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात तुफान पाऊस; जलसाठ्यातही मोठी वाढ
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आता 65 टक्के भरलेत. मागच्या तीन वर्षांच्या तुलनेत जलसाठ्यात भरघोस वाढ झालीये.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव आता 65 टक्के भरलेत. मागच्या तीन वर्षांच्या तुलनेत जलसाठ्यात भरघोस वाढ झालीये.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने जलसाठा 9 टक्क्यापर्यंत खालावला होता. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील जलसाठा 65 टक्क्यांवर पोहोचला आहे.
तानसा धरण ओव्हरफ्लो झालंय. मोडकसागर पाठोपाठ तानसा तलावही भरला.मुंबईला पाणीपुरवठा करणारं दुसरं धरण भरलं. तानसा धरणातील स्वयंचलित गेट क्र.९ उघडलं. मुंबईतल्या 7 पैकी 2 तलाव जुलै महिन्यातच ओव्हर फ्लो झालेत.