COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सकाळीच पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळलाय. त्याचा परिणाम पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे वाहतुकीवरही दिसून येतोय. ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. गोरेगाव - विरार आणि वांद्रे - चर्चगेट वाहतूक सुरू आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्यानं रस्त्यावर वाहतूक कोंडी दिसतेय. त्यातच पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कायम असल्यानं मुंबईचे हाल होतायत. या घटनेमुळे रस्ते मार्गावरही वाहतूक कोंडी दिसू लागलीय. पोलीस पर्याय मार्गाचा वापर करण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना दिसत आहेत. सकाळी कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. ऑफिससाठी बाहेर निघालेले चाकरमानी मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर ताटकळलेत. तुम्हीही या भागात अडकले असाल तर या पर्यायी मार्गाचा वापर करू शकाल... 


अंधेरीतून बाहेर कसे पडाल?


अंधेरी पश्चिमेतून एसव्ही रोडने विलेपार्ले गाठता येईल


अंधेरी पूर्वेतून पश्चिम द्रूतगती महामार्गानं विलेपार्ले गाठता येईल


अंधेरी पश्चिमेतून एसव्ही रोडने जोगेश्वरीकडे जाता येईल


अंधेरी पूर्वेतून जोगेश्वरीला जाण्यासाठी पश्चिम द्रूतगती मार्गानं जाता येईल


अंधेरीहून मेट्रोनं घाटकोपरला येऊन दक्षिण मुंबईकडे येता येईल