Mumbai Weather Forecast: मुंबई सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर दिसून येत आहे. कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात जोरादर पाऊस आहे. मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये दीड ते 2 फुट पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन फुटापर्यंत साचल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  सध्या वाहतूक एसव्ही रोड वरुन वळवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडूनही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून पुढील 4-5 दिवस हे मुसळधार ते अति मुसळधार पडेल, असा इशारा देण्यात आला आहे.


राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पाऊस


दमरम्यान, राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणसह पुणे, सातारा, जळगाव, नाशिक घाट परिसर तसंच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. विदर्भ - मराठवाड्यातही जोरदार पाऊस बरसेल. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 



 मुंबई सकाळपासूनच पावसाची संततधार


मुंबईच्या वरळी परिसरातही पावसाची संततधार दिसून येतेय. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात मंदावलीय. चेंबूर भागातही पाऊस बरसतोय. मुंबई सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर दिसून येतोय. कांदिवली, बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस आहे. मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. 


संततधार पाऊस, अर्धवट राहिलेली रस्त्यांची कामं आणि मुलुंड टोल नाक्यामुळे वाहतूक कोंडी दिसून येतेय. ठाणे ते मुंबईच्या दिशेनं जाणा-या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यायत. वाहतूक कोंडीचा सामना करत चाकरमान्यांना कार्यालय गाठावं लागतंय. विशेष म्हणजे कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. 


ठाणे शहरात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस


ठाणे शहरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र या पावसामुळे ठाण्यासह कळव्यातल्या नालेसफाईची पोल खोल झालेली पाहायला मिळाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कळवा पूर्व परिसरात तलावाचं पाणी बाहेर येऊ लागलंय. तेव्हा तलावातले मासे आणि कासवही रस्त्यावर दिसून येत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर घरात पाणी शिरण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.


वसई-विरारमध्ये जोरदार पाऊस सुरूये. पहिल्याच पावसात रस्त्यांवर, सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालीये. विरार पूर्वेच्या चंदनसार रोडवर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावलीये. पालघरमध्ये सलग चौथ्या दिवशी पालघर जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय. पालघर, बोईसर, डहाणू, कासा, तलासरी परिसरात मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील तीन ते चार तास जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा वर्तवाला आहे . त्यामुले नागरिकांनी घराबाहेर पडताना सतर्कता बाळगावी अस आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय.


सिंधुदुर्ग - रत्नागिरी जिल्ह्यात  चांगला पाऊस


सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरुय. पावसाचा जोर जरी कमी असला तरी रात्रीपासून संततधार कोसळणा-या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय. त्यासोबतच सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय.. जिल्ह्याला ऑरेंज अलर्टही देण्यात आलाय. मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी -गणपतीपुळे मार्गालाही बसलाय.. भंडारपुळेत पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळतोय..


सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. वैभववाडी, कुडाळ, कणकवली, सावंतवाडीत पावसाचा जोर वाढलेला दिसतोय. सिंधुदुर्गाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढच्या तीन ते चार तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासात 87.9 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. मालवण तालुक्यात सर्वाधिक 115 मिलिमीटर तर सावंतवाडी तालुक्यात 107.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.