गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुबंई, कोकण विभागात काल दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम रायगड, महाड, बदलापूर, विभागात झाला असून काही गावांचे संपर्क तुटले आहेत. तर काही ठिकाणी रेल्वे गाड्या देखील अडकल्या असून एनडीआरएफ जवानांना पाचारण करण्यात आले आहे. रेल्वेत अडकलेल्या जवानांना बाहेर काढणायचे काम सुरू आहे. मुबंईतील सखल भागात पाणी जमा झाले असून रेल्वेला याचा फटका बसला नसला रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम दिसून येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विभागात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे 24 तास मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


या पार्श्वभुमीवर मुंबईतून उड्डाण घेणाऱ्या 7 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तर 8 फ्लाईट्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे शाळांच्या सुट्टीचा निर्णय हा त्या विभागातील मुख्याध्यापकांनी घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. 



मुंबईसह रायगड आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून इथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर पालघरमध्ये याआधीच 26 आणि 28 जुलैला हवामान खात्याने हायअलर्ट जारी करण्यात आला होता. पावसाच्या विविध स्थितीत वेगवेगळे अलर्ट जारी करण्यात येतात. ऑरेंज अलर्टमध्ये अधिकाऱ्यांना गंभीर स्थितीतून बाहेर पडण्यास सज्ज राहण्याचे संकेत असतात.