मुंबई : राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. मात्र, पहिल्याच पावसात मुंबईची दैना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे. तसेच कुर्ला, सायन, माटुंगा या ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी तुंबले होते. रेल्वेरुळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटांनी उशिराने होती. तर मुंबईत अनेक सखल भागात पाणी तुंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मुंबईत पहिल्याच पावसात हे हाल असतील तर पुढे काय हाल असतील, असा संतप्त सवाल मुंबईकरांनी विचारलाय. मुंबई महापालिका प्रशासनाने मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. मात्र, ठिकठिकाणचे दृश्य पाहीले तर हा दावा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेकडून नालेसफाई आणि पाण्याची कोंडी होणार नाही, असं काम अपेक्षित होते. मात्र, तसे काही झालेले दिसत नाही, हेच या फोटोवरुन दिसून येत आहे.






COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्यात पावसाने हाल



गोव्यातील पाऊस