मुंबई : मुंबईत आता बेस्ट बसने फिरणं अति स्वस्त होण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या समितीच्या आज होणाऱ्या बैठकीत मोठ्या प्रमाणात कपात केली जाऊ शकते. विशेष म्हणजे वातानुकुलीत बसचे तिकीट दर ६ रूपयांवर आणले जाण्याची शक्यता आहे. तर साध्या गाडीचं भाडं ५ रूपयांवर येऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेनं सशर्त आर्थिक मदत देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामध्ये तिकीट दर कमी करण्याचीही अट होती. त्यानुसार हा प्रस्ताव आज - शुक्रवारी होत असलेल्या बेस्ट बैठकीत मंजूर केला जाऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वातानुकुलीत बसचं सध्या ५ किलोमीटरसाठी भाडं ३० रूपये आहे ते ६ रूपयांवर आणण्याचा प्रस्ताव आहे तर साध्या गाडीचं सध्या ५ किलोमीटरसाठी भाडं ८ रूपये आहे ते ५ रूपयांवर येऊ शकतं.


खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी आणि प्रवाशांना पुन्हा बेस्टकडे आकर्षित करण्यासाठी दर कपातीची मागणी वारंवार होत होती. वातानुकूलित बसच्या तिकीट दरातही कपात होणार असल्याचं समजतंय..



असे असतील नवे दर


५ किमीपर्यंत - ५ रुपये


१० किमीपर्यंत - १०रुपये


१५ किमीपर्यंत - १५ रुपये


१५ किमीच्या पुढे - २० रुपये


दैनिक पास - ५० रुपये