मुंबई : मुंबई महापालिकेनं लाखो रुपये खर्चून नव्यानं तयार केलेल्या रस्त्याची अवघ्या दोन आठवड्यातच चाळण झाली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील शामनगरच्या रस्त्याची ही अवस्थआ कंत्राटदार आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांमुळे झाली आहे. पावसाळआ सुरु झाल्यावर रस्तेकाम करण्यास मनाई असतानाही संबंधित कंत्राटदारानं भर पावसात या रस्त्याचं काम केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तर हा निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करणा-या मनदीप एंटरप्राईजेस या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे काम प्रशासन करत असल्याची माहिती स्थानिक शिवसेना नगरसेवक बाळा नर यांनी दिली. तसंच याला जबाबदार असणा-यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.