मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाराज नेते शिशिर शिंदे यांना आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मात्र, प्रवेश करताना त्यांनी शिवसेनेची जाहीर माफी मागितली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही क्लीप व्हायरल होत आहेत.  पण त्याबद्दल शिवसैनिकांची कान धरून माफी मागतो, असे म्हणत आपल्याला माफ करावे अशी विनवणीही शिंदेंनी यावेळी केली. तुम्ही मला मोठ्या मनाने माफ कराल, असे सांगत हातात हात घालून आतापासून कामाला लागणार असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी वयाच्या १७ वर्षी एका हातात झेंडा घेतला आणि दुसऱ्या हातात धोंडा घेतला. तो कित्ता आता मी गिरवणार आहे, असे सांगत शिवसेनेचा झेंडा विधानसभेत पडकविणार असल्याचे स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिशिर शिंदे यांनी शिवसेनेत घरवापसी केली. यावेळी शिशिर शिंदे यांना शिवबंधन बांधण्यात आले. शिशिर शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. मनसेने सोमवारीच जाहीर केलेल्या कार्यकारिणीतूनही शिशिर शिंदेना डच्चू देण्यात आला होता. 


मातोश्रीवर आमचा संवाद झाला. अतिशय भावपूर्ण गेतला. निघताना, निरोप घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातात हात दिला. त्यांचा हात घेतला. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्पर्श जाणवला. म्हणून मी तो निर्णय पक्का केला. मा. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आणि भगवा झेंडा. वयाच्या १७ वर्षी एका हातात झेंडा घेतला आणि दुसऱ्या हातात धोंडा घेतला. शिवसेनेत असताना ज्याप्रमाणे काम केले. त्याप्रमाणे उद्धवसाहेबांना अपेक्षित असेच उद्यापासून कामाला लागणार आहे. विधानसभेत पुन्हा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असे शिशिर शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.