मुंबई :  जुन्नरवासियांच्या स्वभावाचे पैलु उलगडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे इतके खुलले की त्यांनी सांगितलेले किस्से ऐकून  संपूर्ण सभागृहाची हसून हसून अक्षरश: दमछाक झाली....निमित्त होतं विशाल जुन्नर सहकारी पत संस्थेच्या एक हजार कोटींच्या ठेविंच्या उद्दिष्टपूर्तीचा आनंद सोहळा...या कार्यक्रमाला शिवसेनेचे लोकसभा गटनेते आनंदराव अडसूळ, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, दिलीप वळसे पाटील, अभ्युद्य बँकेचे अध्यक्ष सीताराम घनदाट, स्थानिक मनसे आमदार शरद सोनावणे, पतसंसंस्थेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने जुन्नरवासीय उपस्थित होते. सायन येथील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.