मुंबई : शिवसेनेचे विधान परिषद गटनेते अॅड. अनिल परब आणि शिवसेना नगरसेवक शेखर वायंगणकर यांना नागरिकांनी एका कार्यक्रमात घेराव घालून बाहेर काढले. 


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसैनिक आणि नागरिक यांच्यात शाब्दिक आणि शारीरिक बाचाबाचीही झाली. घटना खार पूर्व तीन बंगला भागात रविवारी घडली. या भागात झोपडपट्टीमध्ये शौचालय लोकार्पणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी ही नेते मंडळी उपस्थित होती.


या झोपड्यांवर सध्या महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. उच्च न्यायायाल्याचे आदेश आहेत की पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या परिसरात असलेल्या झोपड्यांवर कारवाई करा. त्यानुसार येथील झोपडीवासीयांचे माहुल इथं पुनर्वसन केलं जाणार आहे.


मात्र, याला झोपडीवासीयांचा विरोध आहे. माहुलमध्ये मूलभूत सोयीसुविधा नाहीत. तसेच जर, ह्या झोपड्या अनधिकृत आहेत तर मग शौचालय बांधून त्याच्या लोकार्पणाचे नाटक का केले जात आहे? असा झोपडिवासीयांनी प्रश्न उपस्थित केला आहे.



त्यामुळेच रविवारी शिवसेनेच्या नेत्यांना शौचालय लोकार्पण कार्यक्रमात झोपडिवासीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले.