मुंबई : कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर वाराणसी-मुंबई स्पाईसजेटच्या विमानाला अपघात झाला आहे. वाराणसीहून मुंबईला रात्री १० वाजून ५ मिनिटांनी विमान दाखल झालं, पण लँडिंगच्यावेळी विमान रनवे २७ वरुन पुढे गेलं आणि चिखलात रुतलं. सुदैवाने थोडक्यात मोठा अनर्थ टळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विमानातील १८३ प्रवासी आणि क्रु मेंबर सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. धावपट्टीवर विमान उतरत असताना हा प्रकार घडला. मात्र, त्यात कुणीही जखमी झालं नाही.



स्पाइस जेटचे एसजी-७०३ हे विमान मंगळवारी रात्री वाराणसीहून मुंबईला पोहोचले. त्यात १८३ प्रवासी होते. विमानतळावरील २७ क्रमांकाच्या धावपट्टीवर हे विमान उतरत होते. मात्र, उतरत असताना धावपट्टीवर चिखलात विमानाचं चाक फसलं आणि घसरलं. 


मुसळधार पावसामुळं काल रात्री दहा वाजल्यानंतर मुंबईतून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती. आज सकाळीही तीच परिस्थिती असल्यानं दुपारी १२ वाजेपर्यंतची एकूण ३४ उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.