मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार आहे, अजय गुजर यांनी सुरुवातीला संपाची नोटीस दिली होती, ती आज परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर ती नोटीस त्यांनी मागे घेतली आहे. गावात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उद्या आणि परगावी असणाऱ्यांनी एका दिवसानंतर कामावर हजर रहावं, असं आवाहन अजय गुजर यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या निर्णयावर मुंबईत आझाद मैदानात संप करणारे एसटी कर्मचारी नाखुश आहेत, अजय गुजर यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली आहे, तसेच आमचा संप हा संघटनाविरहित आहे, अजय गुजर कोण , आम्ही त्यांना ओळखत नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.



एसटीच्या संपावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होती, एसटी महामंडळाने विलिनीकरणाविषयीचा अहवाल आज कोर्टात सादर केला, कोर्टाने यावर त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या अहवालावर २२ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.