मुंबईच्या उपनगरांतही सुटीच्या दिवशी पावसाची धमाल
असल्फा मेट्रो स्टेशनच्या खाली पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे.
मुंबई : मुंबईसह उपनगरांत वीकएन्डलाच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावला आहे. मात्र सखल भागात पाणी साचल्यानं प्रवास करताना मुंबईकरांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. असल्फा मेट्रो स्टेशनच्या खाली पुन्हा एकदा पाणी तुंबल्याचं चित्र पाहावयास मिळतं आहे.
अशा तुंबलेल्या पाण्यातून गाडी चालवणे मोठे कठीण होऊन जाते. थोडा त्रास होत असला तरी वीक एन्डची धमाल करायला मुंबईकरांना पावसाने चांगले निमित्त दिले आहे.. त्यामुळे मुंबईकर हा पाऊस चांगलाच एंजॉय करत आहेत. तर बोरिवलीतही पावसानं दमदार हजेरी लावली आहे.
पश्चिम उपनगरातील मेट्रोच्या असाल्फा स्टेशनखालीही पाणी साचल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईत सकाळी अचानक पाऊस सुरू झाल्याने, पश्चिम आणि पूर्व उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.