मुंबई : विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर सकाळी साडेपाचच्या सुमारास अज्ञात बॅग दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना असा प्रकार घडल्याने गोंधळ उडाला. त्यांच्या सुरक्षारक्षकांनी अनोखी बॅग सापडल्याची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी तातडीनं प्रसाद लाड यांच्या घरी दाखल होऊन अज्ञात बॅगेची तपासणी केली. बॅगेतून जे बाहेर आलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. ही बॅग कोणी ठेवली याबाबत सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. 



या बॅगेत सोन्या-चांदी देवाच्या मूर्तीचा होत्या. हा प्रकार याअगोदर असा प्रकार झाला होता त्यामुळे पोलिसानी गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.