Thane Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदा सूर्याने नागरिकांना त्रस्त केलं असताना मुंबईकरांना पाणी संकटाला सामोरे जावं लागणार आहे. मुंबईतील काही भागामध्ये आज 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या योजनेमधील 2000 मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढा धाममधील भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच तीनच्या बाजूस स्थलांतरीत करण्याचं काम हाती (thane water cut today) घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये नळाला पाणी नसणार आहे. या कामाचा फटका कुठल्या कुठल्या भागाला पडणार आहे आणि किती वाजेपासून किती वाजेपर्यंत पाणी नसणार आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. (Mumbai Thane Water Cut wednesday 14 March water supply shut off for 24 hours know area details in marathi)


पाणीकपातीचं संकट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनांक - 14 मार्च 2023 बुधवार ते गुरुवारी 15 मार्च 2023 पर्यंत 
वेळ - बुधवारी सकाळी 9 पासून ते गुरुवारी 9 वाजेपर्यंत 


24 तासांसाठी ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद (thane water supply news) राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. 


'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद


 माजीवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिध्देश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी या भागाला कामाचा फटका बसणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशा सूचनाही ठाणे महापालिकेने केल्या आहेत.