मुंबई: घाटकोपर पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद
रेल्वे स्टेशन्सवरील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई: घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. धोकादायक असल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्ट्रकचरल ऑडिटनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अंधेरीच्या गोखले पूलाचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर रेल्वे स्टेशन्सवरील पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय घेण्यात आला होता.
गोखले पूल दुर्घटनेनंतर पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
मुंबईतलच अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्यानंतर मुंबईसह राज्यातील जुन्या पुलांची सुरक्षीतता आणि सुस्थिती याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. वास्तविक पाहता पूल कोसळण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी ठाणे परिसरात एक पूल रेल्वे मार्गावर कोसळला होता. तर अलिकडेच महाड येथील सावित्री नदीवरील पूल पुरात वाहून गेला. यात मोठी जिवीत हानी झाली होती. अशा घटना घडल्या की, पुलांच्या सुरक्षेबाबतचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर येतो. पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी होते. मात्र, कालांतराने हा मुद्दा पुन्हा इतिहासात जमा होतो. हा इतिहास आहे. असे असले तरी, शासनाने राज्यातील अनेक पुल सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले आहेत.
पुलाजवळील रस्त्याला तडे
दरम्यान, गोखले पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच या घटनेच्या काही तासांनी ग्रँट रोड आणि नाना चौकला जोडणाऱ्या पुलाजवळ रस्त्याला तडे गेल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या पूलावरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन रस्ते आणि पूलाची पहाणी केली.