VIDEO : मुंबईत कारचालकाची मुजोरी, क्लीनअप मार्शलला कारवरून फरफटत नेलं
अशा लोकांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे
मुंबई : मुंबईत कोरोना (CORONA) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्यावतीने (BMC) रस्त्यावर मार्शल (clean-up marshals) तैनात करण्यात आले आहेत. हे मार्शल मास्क न घालणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर लक्ष ठेवत असून त्यांच्याकडून दंड वसूल करतात. मात्र, याच मार्शलला अनेकवेळा नागरिकांच्या अडवणूकीला सामोरं जावं लागत आहे.
मुंबईच्या सांताक्रूझ भागात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मास्क न घातलेल्या एका कार चालकाला क्लिनअप मार्शलला अडवलं. पण कार चालकाने कार थांबवण्यास नकार दिला. कारला अडवण्याचा प्रयत्न केला असता मुजोर कार चालकाने क्लिनअप मार्शलला चक्क कारवरुन फरफटत नेलं.
या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न विचारल जात आहे.