मुंबई : मुंबई विद्यापीठाची निकाल जाहीर करण्याची मुदत पुन्हा एकदा टळली आहे. पाच ऑगस्टला निकाल जाहीर केले जातील असं आश्वासन, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं होतं. मात्र ही मुदत पाळण्यात मुंबई विद्यापीठाला अपयश आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता १५ ऑगस्टला निकाल जाहीर केले जातील अशी नवी मुदत, मुंबई विद्यापीठानं जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ३१ जुलैला निकाल जाहीर करण्याचे आदेश राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाला दिले होते. 


राज्यपालांच्या आदेशाचं पालन करण्यात फोल ठरलेल्या मुंबई विद्यापीठाला आता पुन्हा एकदा मुदतवाढीचा आधार घ्यावा लागला आहे.