Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पदवी स्तरावरील बीकॉम सत्र 6 ची परीक्षा 18 मार्च, बीएस्सी सत्र 6 ची परीक्षा 26 मार्च, बीए सत्र 6 ची परीक्षा 26 मार्च 2025 पासून सुरु होणार आहे. तर बीएस्सी आयटी सत्र 6 ची परीक्षा 26 मार्च, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्ग स्वयंअर्थसहाय्यित विषयांची परीक्षा 18 मार्च, बीएमएम आणि बीएएमएमसी सत्र 6 ची परीक्षा 26 मार्च 2025 रोजी घेण्याचे विद्यापीठामार्फत नियोजित करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्याशाखानिहाय मानव्य विज्ञान शाखेसाठी 14723, वाणिज्य शाखेसाठी 74483, विज्ञान 27134, तंत्रज्ञान 13004, विधी 8725 असे एकूण 1 लाख 38 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 75346 मुले, 62717 आणि इतर 6 एवढ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सातही जिल्ह्यातील एकूण 439 परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून 3 महिन्यापूर्वीच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र आणि आसन क्रमांकाची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


विशेष म्हणजे परीक्षा विभागाने विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल युनिव्ह्रर्सिटी पोर्टल (DU portal ) यावर 3 महिन्यापूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांच्या आसन क्रमांकासह परीक्षा केंद्र आणि परिक्षेची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट https://mum.digitaluniversity.ac/ à Know Your Exam Venue नुसार विद्यार्थ्यांना ही तंत्रस्नेही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उन्हाळी सत्र 2025 च्या परीक्षांचे सुक्ष्म नियोजन केले असल्याचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. 


तसेच विद्यार्थ्यांचे विषय, आसन क्रमांक आणि अनुषंगिक तपशील याबाबतचे तात्पुरते प्रवेशपत्र महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून, सर्व महाविद्यालयांनी या प्रवेशपत्रातील तपशील तपासून त्यातील काही दुरुस्ती असल्यास तात्काळ विद्यापीठाकडे संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.