कॉलेज फी 30 % माफ; मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे , त्यांची 100 % टक्के
मुंबई : मुंबईतील महाविद्यालयांना 30 % कपात करण्याची मुंबई विद्यापीठाने सूचना दिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे , त्यांची 100 % टक्के फी माफ करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
राज्य सरकारने जूनमध्ये यासंदर्भात निर्णय घेतला होता. मुंबई विद्यापीठाने यासंदर्भात 4 ऑगस्टला त्यांच्या अखत्यारीतील सर्व महाविद्यालयांना या संदर्भातील सूचना जारी केल्या आहेत.
कोरोनामुळे गेल्यावर्षीपासून कॉलेज शिक्षण हे पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केलं जात आहे. त्यात याच काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे शिक्षणाचा खर्च उचलणं देखील अनेकांना कठीण होऊन बसला आहे. कॉलेज आणि शाळांच्या फी कपात संदर्भात अनेकदा पालकांकडून मागण्या करण्यात आल्या आहेत.
त्यात आता मुंबई विद्यापीठाने मुंबईतील सर्व कॉलेजमध्ये फी कपात करण्याची नोटीस जारी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.