दिपाली जगताप, झी मीडिया, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे.  उशीरा निकाल, कुलगुरू निलंबन अशा प्रकरणांमुळे बदनाम असलेल्या विद्यापीठाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विद्यापीठ बीएमएस पदवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी ११ ते २ या वेळेत होत होती. 


एमव्हीएम कॉलेज परीक्षा केंद्र


दरम्यान एका विद्यार्थीनीकडे परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिकेचा स्क्रिनशॉट असल्याचे समोर आले आहे. अंधेरीच्या एमव्हीएम कॉलेज परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला.


गुन्हा दाखल 


दरम्यान मुंबई विद्यापीठाकडून अंधेरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


विद्यापीठासमोर आव्हान


पेपरफुटीला आळा घालणे हे मुंबई विद्यापीठासमोरचे मोठे आव्हान असणार असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.