Mumbai University: तुम्ही बारावी उत्तीर्ण आहात? बीएससीआयटी केलंय? की एमबीए झालंय? तुमचं शिक्षण यापैकी काहीही असो, तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतो. मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारे गरवारे संस्थेकडून पदभरतीसंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गरवारे ही कलिना विद्यापीठ परिसरात असलेली स्वायत्त संस्था आहे. येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये पदभरतीसंदर्भातील तपशील देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरवारे संस्थेमध्ये प्रमोशन काऊन्सिलर, ज्युनिअर सिस्टिम ऑफिसर आणि शिपाई ही पदे भरली जाणार आहेत. याची प्रत्येकी 1 पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 


पदांचा तपशील


प्रमोशन काऊन्सलर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मार्केटींगमध्ये एमबीए असणे आवश्यक आहे. उमेदवाराला एसईओ, एसएमओ, डिजीटल मार्केटींगची माहिती असावी. यामध्ये उमेदवाराला 55 टक्के गुण असावेत. त्याला मराठी, इंग्रजी येणे गरजेचे आहे. उमेदवाराला संबंधित कामाचा 3 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराचे वय 23 ते 45 वर्षादरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवाराला 43 हजार200 पर्यंत पगार दिला जाणार आहे.


ज्युनिअर सिस्टिम ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बीएससीआयटी, बीसीए असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 21 ते 41 वर्षांदरम्यान असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 24 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. 


शिपाई पदासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवाराकडे संबंधित कामाचा 2 ते 4 वर्षाचा अनुभव असावा. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10 हजार 800 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 


अर्जाची शेवटची तारीख


29 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.


कुठे पाठवाल अर्ज


इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज  गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई 400098 येथे पाठवायचे आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा