मुंबई विद्यापीठाची वेबसाईट ४८ तासानंतरही ठप्पच
४८ तास उलटून गेले तरी मुंबई विद्यापीठाची वेबसाईट अजूनही ठप्पच आहे.
मुंबई : ४८ तास उलटून गेले तरी मुंबई विद्यापीठाची वेबसाईट अजूनही ठप्पच आहे.
आधीच मुंबई विद्यापीठाचे निकाल उशिरा लागल्यानं विद्यार्थ्यांचे हाल झालेत. त्यातच तांत्रिक बिघाडामुळं वेबसाइट कोलमडलीय... त्यामुळं जाहीर झालेले निकालही विद्यार्थ्यांना पाहता येत नाहीत. मग निकाल जाहीर करून तरी काय उपयोग? असा सवाल विद्यार्थी करतायत.
४८ तास उलटले तरी वेबसाइट दुरूस्त करता येत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जातोय. निकाल जाहीर करण्यासाठी कोर्टानं ३१ ऑगस्टची नवी मुदत दिलीय. सध्याचा सावळागोंधळ पाहत ही डेडलाईन विद्यापीठ प्रशासन पाळू शकेल का? अशी शंका व्यक्त केली जातेय.