मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून ४७७ पैकी ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेत. आता मुंबई विद्यापीठात प्रशासकीय अधिकारी नेमला जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सक्तीच्या रजेवर असलेले कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर काय कारवाई होणार याबाबतच्या चर्चेला जोरदार सुरूवात झालीय. तर प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी निकालाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यावर ते परत कोल्हापूर विद्यापीठात रुजू होणार का याबाबतही चर्चा होतेय. त्यामुळे आता राजभवन आणि उच्च शिक्षण विभाग काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.