मुंबई :   विद्यार्थी आणि एकुणच शैक्षणीक क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळणार आहेत. विद्यापीठातील अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आल्यावर डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरूपदापासून दूर जावे लागले. त्यानंतर गेले बराच काळ डॉ. दयानंद शिंदे हे मुंबई विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरू म्हणून सांभाळत आहेत.


राज्यपाल घेणार मुलाखत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  नव्या कुलगुरूंची १९ एप्रिलला घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १९ एप्रिलला राज्यापाल कुलगुरूपदासाठी मुलाखत घेणार असून त्याच दिवसी नव्या कुलगुरूंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. कुलगुरू निवडीसाठी स्थापन केलेल्या कस्तुरीरंगन समितीनं राज्यपालांना पाच जणांची नावं सादर केलेली आहेत. या पाचही जणांची मुलाखत घेतल्यावर त्यापैकी एकाचे नाव कुरूगुरू पदासाठी राज्यपाल जाहीर करतील.


३२ अर्जांमधून केवळ ५ नावे अंतिम फेरीत


कस्तुरीरंगन समितीकडे कुलगुरूपदासाठी 32 जणांनी अर्ज केले होते. या ३२ जणांच्या अर्जाची छाननी केल्यावर अवघे ५ अर्ज अंतिम फेरीत पोहोचले. आता या पाचपैकी कोणाची वर्णी कुलगुरूपदावर लागते याबाबत उत्सुकता आहे. डॉ. संजय देशमुख यांना कुलगुरूपदावरून दूर केल्यानंतर सध्या प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. दयानंद शिंदे  मुंबई विद्यापीठाचा कार्यभार सांभाळत आहेत.