Mumbai University Exam Dates:  मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. विद्यापीठाच्या द्वितीय सत्र (हिवाळी 2024) मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. चारही विद्याशाखाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा यात समावेश आहे. हिवाळी सत्र 2024 साठी आयोजित होणाऱ्या या परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युरन्स, अकॉऊन्टींग अँड फायनान्स आणि बीएमएस सत्र 5 च्या परीक्षा या 23 ऑक्टोबर 2024 पासून आयोजित केल्या जाणार आहेत. तृतीय वर्ष बीए सत्र 5 च्या परीक्षा 13 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहेत. एलएलबी ( 3 वर्षीय) सत्र 5 आणि एलएलबी ( 5 वर्षीय) सत्र 9  ची परीक्षा 19 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील तृतीय वर्ष बीएस्सी, बीएस्सी ( संगणक शास्त्र), (जैवतंत्रज्ञान), (माहिती तंत्रज्ञान), (फॉरेन्सिक) आणि (डेटा सायन्स) सत्र 5 च्या परीक्षा 13 नोव्हेंबर 2024 पासून आयोजित केल्या जातील. यासह पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इंजिनीअरींग, आर्कीटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर आगाऊ वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु आहे.


विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे दाखल करावयाच्या अर्जाचा कालावधी आणि परीक्षा शुल्क विनाविलंब भरण्याचा कालावधीही सोबतच्या परिपत्रकानुसार निर्गमित केला असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी दिलेल्या कालावधीतच परीक्षा अर्ज आणि शुल्क भरण्याची कार्यवाही करण्यात यावी असे आवाहनही त्यांनी केले.


विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिप


शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून दोन्ही विद्यापीठामार्फत एमएससी केमिस्ट्री या सह पदवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण मुंबई विद्यापीठात तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपही करता येणार आहे. विशेष म्हणजे सह पदवी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या या सह पदवीमुळे प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृध्दीस हातभार लागणार आहे.


अध्ययन आणि संशोधनातील संभाव्य परिणाम


एमएससी केमिस्ट्री या अभ्यासक्रमासाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वातावरणात केमिस्ट्रीमधील विविध विषयातील अध्ययनाच्या शाखा, संशोधन पद्धती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि  उपकरणांचा अभ्यास करता येईल. त्याचबरोबर या सहयोगाअंतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत आणि अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापरामुळे अध्ययन आणि संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. 


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा