मुंबईत मुलींच्या गुंडगिरीचा धक्कादायक Video, शाळकरी मुलीला थांबवलं आणि लाथा-बुक्क्यांनी तुडवलं
Versova Girls Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुलींच्या एक ग्रुप शाळेत जाणाऱ्या मुलीला रस्त्यावर थांबवून तिला बेदम मारहाण करताना दिसत आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियवर पोस्ट केला आहे.
Versova Girls Viral Video : मारहाण आणि गुंडगरी करण्यात आता मुलीही मागे नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुलींच्या एक ग्रुप शाळेत जाणाऱ्या मुलीला रस्त्यावर थांबवून तिला बेदम मारहाण (Brutally Beaten by School Girl) करताना दिसत आहे. चार ते पाच मुली एका मुलीला अक्षरश: लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. याचबरोबर अर्वाच्य भाषेत तिला शिव्याही देतायत. मार खाणाऱ्या मुलीच्या अंगावर शाळेचा युनिफॉर्म दिसत आहे. मुंबईतल्या वर्सावा इथल्या यारी रोडवरची (Versova Yari Road) ही घटना आहे. मारहाण करणाऱ्या मुलीही अल्पवयीन आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात येत असून मारहाण करणाऱ्या मुलींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सामाजिक कार्यकर्त्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी हा व्हिडिओ आपल्या एकस हँडलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शन दिला असून यात त्यांनी 'मुंबईतल्या यारी रोडवर शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला मुलींच्या एका ग्रुपने अमानुष माराहण केली' असं लिहिलं आहे. सोबत त्यांनी मुंबई पोलिसांना या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली आहे. व्हिडिओत तीन ते चार मुली एका शाळकीर विद्यार्थिनीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. तिचे केस पकडून तिला घसटवत असल्याचंही या व्हिडिओत दिसतंय.
मुलींच्या तावडीतून कशीबशी पीडित मुलगी आपली सुटका करुन घेते, पण यानंतर पुन्हा त्या मुली पीडित मुलीचे केस पकडून तिला अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे मारहाण होत असताना आसपास लोकांची गर्दी दिसतेय, पण पीडित मुलीच्या मदतीला एकही जण पुढे येताना दिसत नाही. बऱ्याच वेळाने काही तरुण मुलांनी पीडित मुलीला मारहाण करणाऱ्या मुलींच्या तावडीतून बाहेर काढलं.
दीपिका नारायण भारद्वाज यांनी 25 ऑगस्टला हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडिायर हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया
या व्हि़डिओवर अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. मारहाण होत असताना काही तरुण बाजूला उभे असातनाही शाळकरी मुलीच्या मदतीला कोणी आलं नाही, ही खूप लाजीरवाणी गोष्ट असल्याचं एका युजरने म्हटलं आहे. तर पोलिसांकडे तक्रार करुनही फायदा नाही, पोलीस मारहाण करणाऱ्या मुलींना 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगतील आणि सोडून देतील अशी संतप्त प्रतक्रिया दिली आहे.